शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

अन्यायाचा, आरोपांचा हिशेब चुकता करणार : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:27 IST

कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्षभरात प्रचंड घाव सहन केले आहे. अन्याय, आरोप, हल्ले पचवले आहेत. आता माघार नाही, हिशेब चुकता करणार आहे, असा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला. तर वेळ येईल त्या दिवशी सामान्य जनता गुलाल लावून रस्त्यावर ...

कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्षभरात प्रचंड घाव सहन केले आहे. अन्याय, आरोप, हल्ले पचवले आहेत. आता माघार नाही, हिशेब चुकता करणार आहे, असा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला. तर वेळ येईल त्या दिवशी सामान्य जनता गुलाल लावून रस्त्यावर नाचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या लोकसभा निवडणुकीचेच आव्हान दिले आहे.शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावचावडीसमोर रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी आयोजित केलेल्या शेतमजूर संघटनेच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बिल्किस मुजावर होत्या. यावेळी रयत क्रांतीचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील, सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री खोत यांची उघड्या जीपमधून गावात मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यात शेतमजूर विशेषत: महिलांची उपस्थिती अधिक होती.यावेळी खोत यांनी नाव न घेता खासदार शेट्टी यांच्यावर टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले, संधीसाधू व भावनिकतेचे राजकारण फार काळ टीकत नाही. लोकांना उपाशी ठेवून स्वत: गबर व्हायचे दिवस आता संपले आहेत. ‘स्वाभिमानी’ची मूल्यमापन समिती खासदार शेट्टी यांचा जयजयकार करणारी आहे. मी कुणाचा गुलाम राहणार नाही. आवाडे नको म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिले अन् आता गळ्यात गळे घालत आहेत, ही कसली नैतिकता.मी शेतकºयांसाठी लढणारा कार्यकर्ता असून, पाकिटातून पैसे घालून, सभेत डबे फिरून पैसे मिळणाºयांची मला गरज नाही. तर मायेने हात फिरवणाºया माणसांची गरज आहे. जातीपाती पलीकडे जाऊन सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व सामान्य जनतेला घेऊन राजकारण करणार असून, तालुक्यात नवी क्रांती करणार आहे. शेतमजूर महिलांच्या पेन्शनसाठी तुम्ही रस्त्यावरील लढाई लढा. मी मंत्रालयाची लढाई लढून तुम्हाला न्याय मिळवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी सुरेशदादा पाटील, शेतमजूर संघटना प. महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे, सागर खोत, जि. प. सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची भाषणे झाली.कार्यक्रमास टाकवडेचे सरपंच पी. वाय. पाटील, उपसरपंच नागेश काळे, संजय शिंदे, उपसरपंच विलास चौगुले, विजय मगदूम, रावसाहेब बिरोजे, आदी उपस्थित होते. आभार डॉ. कुमार पाटील यांनी मानले.ऊस परिषद नव्हे हे तर 'जलसा'‘स्वाभिमानी’च्या परिषदेत उसाच्या दराचा मुद्दा बाजूलाच राहिला. प्रत्येक वक्ता माझ्यावर तोंडसुख घेत होता. प्रत्येक वक्त्याला माझ्यावर काय बोलायचे हे शेट्टी यांनी सांगून ठेवले होते. त्यामुळे लोकांची करमणूक होत असल्याने ही ऊस परिषद नसून जलसाच होती, अशी टीका मंत्री खोत यांनी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.शेतमजुरांसाठी रुग्णवाहिकाशेतमजुरांनी स्वत:ला एकटे समजू नये. तुमच्या प्रत्येक सुख-दु:खात फक्त सदाभाऊ सहभागी राहणार असून, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतमजूर संघटनेला शासनाकडून रुग्णवाहिका देण्याचे मंत्री खोत यांनी जाहीर केले.

टॅग्स :Politicsराजकारण